वासुदेव आऽऽला वासुदेऽऽऽऽव आऽऽला होऽऽऽऽ
सकाळच्या पाऽऽऽऽरी हरिनाम बोला
खणखणीत आवाज.पण तितकाच सुरेल. लहानपणा पासून कित्येत वासुदेब बघितले, ऐकले; पण असा सुरांची जाण असलेला पाहिल्यांदाच. सकाळी ६-६:१५च्या दरम्यान गाढ झोपेत असलेला मी खाडकन जागा झालो. त्यानं उठा पांडुरंगा म्हणेपर्यंत झोप डोळ्यावरुन पूर्ण उतरली होती. एकदा वाटलं पटकन ध्वनीमुद्रित करावं आणि youtube वर टाकावं पण आळस आडवा आला आणि मी गादीवर लोळत त्याचं गाणं ऐकत तसाच पडून राहिलो.
आवाज इतका खणखणीत की त्याला माईकची गरज नाही. गाणं म्हणत म्हणत तो दूरवर गेला तरीही त्याचा आवाज येतच होता. जून्याकाळी, राजा-रजवाड्यांच्या काळात, ज्यावेळी माईक किंवा amplifiers नव्हते, त्या काळात असता तर ह्याच्यावर वासुदेब व्हायची पाळी आली नसती कदाचित इतका सुंदर आणि standout आवाज.
(वासु)देव करो आणि हा वासुदेव कुणा जाणकार (आणि 'पोहोच' असलेल्या) माणसाच्या कानावर पडो.
Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts
Friday, November 4, 2011
Saturday, February 5, 2011
सुकलेल्या खोडाचं गुलाबी स्वप्न
आजकाल नवीन लेन्स घेतल्यापासून रोज कुठेतरी रानात फोटो काढत भटकत असतो. तसाच आजही गेलो होतो. घरी आल्यानंतर फोटो चेक केले आणि ते एका मागोमाग एक एडिट करत असताना हा फोटो समोर आला -

फोटो तर छान आला होताच, पण त्या सुकलेल्या झाडाला फुटलेल्या गुलाबी मोहोराचा विरोधाभास बघून सुचलेल्या या चार ओळी -

फोटो तर छान आला होताच, पण त्या सुकलेल्या झाडाला फुटलेल्या गुलाबी मोहोराचा विरोधाभास बघून सुचलेल्या या चार ओळी -
जीर्ण तनु जरी झाले तरीही
मनी पाकळी फुटे गुलाबी
ययातिपरी शापित जगणे
शरीर सुके पण ओठ शराबी
मनी पाकळी फुटे गुलाबी
ययातिपरी शापित जगणे
शरीर सुके पण ओठ शराबी
Monday, May 17, 2010
पिपात मेल्या ओले उंदीर
बा. सी. मर्ढेकरांची 'पिपात मेले ओल्या उंदीर' वाचल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे.
झेपलीच नाही मला बिलकुल.
आणि त्याहून जास्त त्रास मला कशाचा झाला असेल तर तो मर्ढेकरांच्या शब्दरचनेचा.
'पिपात मेले ओल्या उंदीर' पेक्षा 'पिपात ओल्या मेले उंदीर' जास्त समर्पक आणि सरळ-सोपं झालं नसतं का?
का 'ओल्या' हे विशेषण पिपाबद्दल आहे हे प्रयत्नपूर्वक समजून घ्यायचा मानसिक त्रास द्यायचाच लोकांना?
हा जो त्रास मला झाला/अजुनही होतोय, त्यावरचा उतारा म्हणून, आणि त्याचा सूड म्हणून, केलेलं हे त्या कवितेचं विडंबन.
विडंबन वाचण्याआधी मूळ कविता वाचलीत तर, न जाणो, तुम्हाला हे विडंबन आवडूनही जाईल कदाचित. मूळ कवितातुम्हाला इथे वाचायला मिळेल.
विडंबनाचा विषय तसा थोडा अतरंगीच आहे. विडंबनच अतरंगी, मग विषयाला का सोडा? असो. तर एक सांगकाम्या-ओं-नाम्या नोकर एकावर एक 'फ्री' मिळालेला पिंप उघडून न पाहता तसाच घेउन येतो. त्याची मालकीण तो उघडून बघते मात्र, आणि तिच्या मुखातून आलेलं, त्या नोकराबद्दल तिला असलेला आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा दर्शवणारं, शब्दांमृत, म्हणजे हे काव्य -
---------------------------------------------------------------
पिपात मेल्या ओले उंदीर
असे आणलेसंच कसे, बघितल्याविण
फुकट मिळाले म्हणुनी आणशी
न बघता तू, बुद्धिहीन
बीळ सोडुनी सांग कसे ते
पिपात (या) आले ओले होऊन?
दिवस सांडला बोंबलत फिरण्यात
या गिळायला, आता हातपाय धूऊन
अंगात ना काही शक्ती आहे,
डोक्यात ना कुणी युक्ती आहे.
पोरींवरती लहरी डोळे
फेकशी पण
मधाळ स्मित;
त्या ओठांवरचे, ते ही
बेकलाइटी, बेकलाइटी!
रागाने करीसी पिंप आडवे,
पिपात(ले) उंदीर पळाले! पळाले!
---------------------------------------------------------------
आवडेल, न आवडेल कुणास ठाउक. नाही आवडलं तर तुमच्या भावना पोहोचवण्यासाठी comments section आहेच.
पण जर चुकून माकून आवडलं, तर त्याचं श्रेय अत्र्यांना. कारण डोक्यात गेलेला हा किडा झेंडूच्या फुलांतून आला असावा असं माझं self assessment आहे.

Monday, April 26, 2010
लिनक्स, विंडोज आणि कुसुमाग्रज
Linux आणि Windows या दोन Operating systems आहेत हे आपल्याला माहिती असेलच. Windows वापरणारे आणि linux वापरून पुन्हा नाईलाजास्तव windows platform वर परतावं लागलेले लोक windows ला किती दात-ओठ खाऊन नावं ठेवतात त्याचीही आपल्याला कल्पना असेल. पण मी आत्ता जो एक वेगळा angle तुम्हाला सांगणार आहे तो मात्र नक्कीच तुम्हाला नविन असेल याची खात्री आहे मला.
मराठीचा अभ्यास ज्यांनी केलाय किंवा ज्यांना साहित्याची थोडीफार का होइना जाण आहे, त्यांना कुसुमाग्रजांच्या कविता माहित असायला काही हरकत नाही. आता तुम्ही म्हणाल linux/windows आणि कुसुमाग्रजांच्या कविता यांचा काय संबंध आहे? संबंध आहे. कुसुमाग्रजांच्या कवितांचा कुठलाही पूर्वग्रह न ठेवता बारकाईने अभ्यास केल्यास असं दिसून येईल की, तुमच्या-आमच्या सारख्या मर्त्य मानवांनाच नाही तर कुसुमाग्रजांसारख्या दैवी कवीला देखिल windows चा प्रचंड उबग आला होता अणि त्यांचं सुद्धा linux वर खूप प्रेम होतं.
एक उदाहरणच घ्या ना. त्यांच्या 'पृथ्वीचं प्रेमगीत' या कवितेमधलं एक कडवं पहा -

'परि भव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझि दूरता त्याहुनी साहवे'
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझि दूरता त्याहुनी साहवे'
आता वर वर पाहता हे एक प्रेमगीत वाटतं. पृथ्वीनं सूर्याला लिहिलेलं. कुसुमाग्रजांनी कवितेला नावही तसंच दिलंय पहा. जेणेकरून कुणा सोम्या-गोम्याला संशय येऊ नये. पण खरा अर्थ लावायचा झाला तर कुसुमाग्रजांनी या ओळी linux ला संबोधून लिहिल्या असाव्यात असं दिसतं.
पहिल्या ओळीत ते म्हणतात -
पहिल्या ओळीत ते म्हणतात -
'परि भव्य ते तेज पाहून पूजून'
'घेऊ गळ्याशी कसे काजवे'
कुसुमाग्रज linux च्या stability, reliability, developer-friendliness, opensource philosophy यांसारख्या गुणांनी किती प्रभावित झाले असावेत ते यावरून लक्षात येतं. पुढं जाउन ते विचारतात की linux मधे एवढे सगळे गुण असताना -
'घेऊ गळ्याशी कसे काजवे'
इथं 'काजवे' म्हणजे windows असा अर्थ त्यांना अभिप्रेत असावा. Linux एवढं powerful आणि reliable असताना, windows सारखी powerless, buggy, closed-source आणि monopolistic system कशी वापरायची असा साहजिक प्रश्न ते विचारतात आणि म्हणतात -
'नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा'
इथं दुर्बळ म्हणजे पुन्हा windows. घडीघडीला छोट्या छोट्या कारणांवरून crash आणि restart होणार्या windows ला ते अतिशय मर्मिकरित्या दुर्बळ म्हणून संबोधतात. त्याही पुढे जाऊन ते windows ने पुरवलेल्या भड़क graphical effects, GUI, screen-saver अशा डोळ्यांचं समाधान करणार्या पण व्यावहारिक जीवनात काडीचाही उपयोग नसणार्या facilities ना 'क्षुद्र शृंगार' अशी शेलकी उपमा देऊन म्हणतात -
'तुझी दूरता त्याहुनी साहवे'
म्हणजे linux जरी तिकडं दूर अमेरिकेतल्या server वर run होंत असेल आणि इथून भारतातून त्या linux server ला connect करायसाठी जरी PuTTY चा वापर करावा लागत असेल तरीही दुर्बळांच्या (windows च्या) क्षुद्र शृंगारापेक्षा (भड़क GUI पेक्षा) ते तेजःपुंज आणि powerful असं PuTTY चं काळं command-line terminal केंव्हाही बेहेत्तर! या ओळीवरून कुसुमाग्रजांनी त्याकाळात देखिल उत्सुकतेपोटी अणि linux प्रेमापोटी PuTTY वापरून दूरदेशीच्या एखाद्या linux server ला connect केलं असण्याची दाट शक्यता वाटते. असो.
या खळबळजनक संशोधनाबद्दल वाचल्यानंतर तुमच्या मनात या संशोधाकबद्दल नितान्त आदर निर्माण होणं साहजिक आहे. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की या गुणवान संशोधकाला बारावीच्या परीक्षेत मराठीमधे १०० पैकी ३५ गुण मिळाले होते. IT field मधे दिवसभर घाम गाळुन काम करणार्या, आणि थकून-भागून घरी आल्यानंतर देखिल अथक संशोधन करून कुसुमाग्रजांच्या कवितांकडे बघण्याची एक वेगळी नजर जगाला देणार्या होतकरू मराठी अभ्यासकाला बारावीसारख्या महत्वाच्या वर्षी मातृभाषेच्या परीक्षेत काठावर उत्तीर्ण करणार्या त्या परिक्षकाचा धिक्कार असो! आईनस्टाईनला सुद्धा लहानपणी गणितात खुप कमी गुण मिळायचे म्हणे. पण तो निदान तिकडं यूरोपात तरी होता. इथं भर महाराष्ट्रात झालेल्या या एका मराठी-भाषिकाच्या गळचेपिचा मुद्दा राज ठाकरेंनी संसदेत उपस्थित करावा अशी माझी इच्छा आहे. असो. यावर परत केंव्हा तरी बोलू.
तर हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला हिंसाचार करायची बुद्धि झाल्यास तो बौद्द्धिक पातळीवर करावा. ज्यावर हा लेख वाचताय तो संगणकही तुमचाच आणि तुमच्या डोक्यावरचे केसही तुमचेच हे ध्यानात असुद्या.
टीप:
या कवितेतील इतर कडव्यांचे अणि कुसुमाग्रजांच्या इतर कवितांचे linux अणि windows शी संबंधित अन्वयार्थ - यावरपुढील संशोधन सुरु आहे. या घडीला या एका कडव्याशिवाय इतर काही प्रकाशित करता येणार नाही. संशोधन पूर्ण होताचयोग्यवेळी सर्व गोष्टी उघड करण्यात येतील. चिकित्सा करण्याचा मोह आवरल्याबददल धन्यवाद.

Saturday, January 2, 2010
अस्वस्थ
गुलाबी कविता करायला वयाची अट नसते. पण योग्य वयात केलेल्या गुलाबी कवितेची लाली देखिल काही औरच असते .... ती करणारय़ा 'कवी'साठी! तर अशीच योग्य वयात सुचलेली ही एक गुलाबी कविता. आवडली तर प्रतिभा समजा, नाही आवडली तर वयाचा दोष समजा -
ना कळे कधी, तुझिया प्रति
हे भाव मधुर मनी दाटले
अस्वस्थ मी, अस्वस्थ ग,
हे काय मजला जाहले
दिसतेस तू, चाफे-कळी
की तारका, नभीची कुणी
स्मित-हास्य ते कवितेपरी
नक्षत्र धरी जणू उतरले
अस्वस्थ मी, अस्वस्थ ग,
हे काय मजला जाहले
सहवास तुझा, ग मृण्मयी
मिळण्या हे मन आतूरले
पुसण्या परि, धीर ना तरी
भय-रूपी राक्षस मातले
अस्वस्थ मी, अस्वस्थ ग,
हे काय मजला जाहले
नि मग एकदा, कळले मला
हृदयी तुझ्या वसतो कुणी
नैराश्य ते गगनापरी
मन:पटल व्यापुनी राहिले
अस्वस्थ मी, अस्वस्थ ग,
हे काय मजला जाहले
समजेल का मजला कधी
काय ईश्वरा तुझिया मनी
भेटेल का रे मज कधी
ती मानसी हृदयातली?
उत्तरे जरी प्रश्नांची या
मी शोधितो सगळीकडे,
प्रेषित का शापित मी, परि
ना समजले, ना उमगले
अस्वस्थ मी, अस्वस्थ ...
अरे हे काय मजला जाहले
ना कळे कधी, तुझिया प्रति
हे भाव मधुर मनी दाटले
अस्वस्थ मी, अस्वस्थ ग,
हे काय मजला जाहले
दिसतेस तू, चाफे-कळी
की तारका, नभीची कुणी
स्मित-हास्य ते कवितेपरी
नक्षत्र धरी जणू उतरले
अस्वस्थ मी, अस्वस्थ ग,
हे काय मजला जाहले
सहवास तुझा, ग मृण्मयी
मिळण्या हे मन आतूरले
पुसण्या परि, धीर ना तरी
भय-रूपी राक्षस मातले
अस्वस्थ मी, अस्वस्थ ग,
हे काय मजला जाहले
नि मग एकदा, कळले मला
हृदयी तुझ्या वसतो कुणी
नैराश्य ते गगनापरी
मन:पटल व्यापुनी राहिले
अस्वस्थ मी, अस्वस्थ ग,
हे काय मजला जाहले
समजेल का मजला कधी
काय ईश्वरा तुझिया मनी
भेटेल का रे मज कधी
ती मानसी हृदयातली?
उत्तरे जरी प्रश्नांची या
मी शोधितो सगळीकडे,
प्रेषित का शापित मी, परि
ना समजले, ना उमगले
अस्वस्थ मी, अस्वस्थ ...
अरे हे काय मजला जाहले
Thursday, December 17, 2009
माझा पहिला हिंदी शेर
ऑफिसमधल्या एका मित्राच लग्न ठरलं असं कळल्यानंतर त्याची खेचत असताना त्यानं एकदम विचारलं, "तुम्हारा क्या? कब कर रहे हो शादी-वादी? कोई गर्लफ्रेंड तो होगीही???"
त्यानं माझ्या मधे एवढा विश्वास(!) दाखविल्यावर सुचलेला हा शेर.
वाचण्याआधी चप्पल लांब बाजूला काढून ठेवलीत तर ती उचलून मारायची बुद्धी होणार नाही आणि तुमचाच मनस्ताप थोड़ा कमी होइल बाकी काही नाही. असो. नमनाला घडाभर तेल नको. मला सूचलेला तो शेर असा -
जालिम मुहोब्बत तो हमें सिर्फ सितारोंसे होती हैं
कंबख्त मुश्किलें भी देखो हमें कैसी कैसी आती हैं
सितारें जमीन पे कभी आ नहीं सकते
और जीतेजी हम आसमान में कभी जा नहीं सकते
वाह वाह वाह वाह ..... चप्पल बाजूला काढून ठेवल्याचा उपयोग झाला की नाही सांगा?
Updated (२ जानेवारी १०): शेर मधल्या शेवटच्या दोन ओळी बदलून शेर थोडा इफेक्टिव करायचा प्रयत्न केलाय.

Thursday, November 12, 2009
अबू आझमी आणि विधानसभेतील राड़ा
अलीकडंच महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेल्या राड्यानंतर अबू आझमींनी ठरवलं की झालं तेवढं खूप झालं, आता यापुढे मराठीतच बोलायचं. राजला वावगं पोलिटीकल माइलेज मिळू द्यायचं नाही. आणि मग काय विचारता एक-दोन दिवसात त्यांनी मराठीचा जोरदार अभ्यास केला अणि विधानसभेत झालेला राड़ा चक्क 'रेशमाच्या रेघांनी' च्या सुरात म्हणून दाखवला.
तर तोच हा राडा, शब्दबद्ध केला आहे अबू आझमींनी -
शपथ घेत होतो मोठ्या गुर्मीत
रोवण्या हिंदीचा झेंडा, मराठी मातीत ... मातीत बाई मातीत ...
सोनेरी वंजाळेनं, चकाकत्या हातांनी
स्टेजवरचा माइकच उपसून काढीला
हात नका लावू माझ्या माइकला ...
हिंदीवरती माझी पोळी भाजण्यासाठी
गरज होती मला, मराठी झिडकारायची ... बाई बाई, झिडकारायची ...
हिंदीतच शपथ घेतली, अणि वर चप्पल दाखवली
कुवे-के-मेंडक का तोरा कैसे जीरवला
हात लावून दाखवा माझ्या बॉडी ला ...
नवीकोरी चप्पल, माझ्या आझमगडची
मुलायम ने दिली, राजला दाखवायसाठी ... बाई बाई, दाखवायसाठी
शिंद्यांच्या शिशिरानं, महाराष्ट्राचा नकाशा,
गालावर माझ्या की हो काढीला ...
हात नका लावू माझ्या गालाला ...
करायला गेलो, एक, झाले भलतेच
भर विधानसभेत झाली रस्सीखेच ... रस्सीखेच बाई रस्सीखेच
वाचवण्या जीव माझा, मीनाक्षीताई धावल्या
एका स्त्री च्या मागे आश्रय शोधीला
प्लिझ हात नका घालू माझ्या अब्रुला ...

Subscribe to:
Posts (Atom)