Friday, November 4, 2011

वासुदेव

वासुदेव आऽऽला वासुदेऽऽऽऽव आऽऽला होऽऽऽऽ
सकाळच्या पाऽऽऽऽरी हरिनाम बोला

खणखणीत आवाज.पण तितकाच सुरेल. लहानपणा पासून कित्येत वासुदेब बघितले, ऐकले; पण असा सुरांची जाण असलेला पाहिल्यांदाच. सकाळी ६-६:१५च्या दरम्यान गाढ झोपेत असलेला मी खाडकन जागा झालो. त्यानं उठा पांडुरंगा म्हणेपर्यंत झोप डोळ्यावरुन पूर्ण उतरली होती. एकदा वाटलं पटकन ध्वनीमुद्रित करावं आणि youtube वर टाकावं पण आळस आडवा आला आणि मी गादीवर लोळत त्याचं गाणं ऐकत तसाच पडून राहिलो.

आवाज इतका खणखणीत की त्याला माईकची गरज नाही. गाणं म्हणत म्हणत तो दूरवर गेला तरीही त्याचा आवाज येतच होता. जून्याकाळी, राजा-रजवाड्यांच्या काळात, ज्यावेळी माईक किंवा amplifiers नव्हते, त्या काळात असता तर ह्याच्यावर वासुदेब व्हायची पाळी आली नसती कदाचित इतका सुंदर आणि standout आवाज.

(वासु)देव करो आणि हा वासुदेव कुणा जाणकार (आणि 'पोहोच' असलेल्या) माणसाच्या कानावर पडो.

2 comments:

Shardul said...

१ पोर्ट्रेट तो बनता है...

shreyas said...

हो रे खरंच. लहानपणी जितके वासुदेब त्या तुलनेत आता तुरळकंच दिसतात. कुणी सांगावं, आणखी काही वर्षांनी दिसाययचेच बंद होतील. सो पोर्ट्रेट तो बनता है ... पुन्हा कधी संधी मिळाली की