अलीकडंच महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेल्या राड्यानंतर अबू आझमींनी ठरवलं की झालं तेवढं खूप झालं, आता यापुढे मराठीतच बोलायचं. राजला वावगं पोलिटीकल माइलेज मिळू द्यायचं नाही. आणि मग काय विचारता एक-दोन दिवसात त्यांनी मराठीचा जोरदार अभ्यास केला अणि विधानसभेत झालेला राड़ा चक्क 'रेशमाच्या रेघांनी' च्या सुरात म्हणून दाखवला.
तर तोच हा राडा, शब्दबद्ध केला आहे अबू आझमींनी -
शपथ घेत होतो मोठ्या गुर्मीत
रोवण्या हिंदीचा झेंडा, मराठी मातीत ... मातीत बाई मातीत ...
सोनेरी वंजाळेनं, चकाकत्या हातांनी
स्टेजवरचा माइकच उपसून काढीला
हात नका लावू माझ्या माइकला ...
हिंदीवरती माझी पोळी भाजण्यासाठी
गरज होती मला, मराठी झिडकारायची ... बाई बाई, झिडकारायची ...
हिंदीतच शपथ घेतली, अणि वर चप्पल दाखवली
कुवे-के-मेंडक का तोरा कैसे जीरवला
हात लावून दाखवा माझ्या बॉडी ला ...
नवीकोरी चप्पल, माझ्या आझमगडची
मुलायम ने दिली, राजला दाखवायसाठी ... बाई बाई, दाखवायसाठी
शिंद्यांच्या शिशिरानं, महाराष्ट्राचा नकाशा,
गालावर माझ्या की हो काढीला ...
हात नका लावू माझ्या गालाला ...
करायला गेलो, एक, झाले भलतेच
भर विधानसभेत झाली रस्सीखेच ... रस्सीखेच बाई रस्सीखेच
वाचवण्या जीव माझा, मीनाक्षीताई धावल्या
एका स्त्री च्या मागे आश्रय शोधीला
प्लिझ हात नका घालू माझ्या अब्रुला ...
Thursday, November 12, 2009
Subscribe to:
Posts (Atom)